पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रत्येकाशी प्रेमाणे वागून चांगली सेवा कशी देता येईल यावर लक्ष केंद्रीत करा, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री एकविरा कृपा इंटरनेट केबल सर्व्हिसेचच्या उद्घाटनावेळी उलवे येथे केले.
उलवे परिसरात वाढते नागरीकरण लक्षात घेता नव नवीन उद्योग सुरू होत आहेत. त्यानुसार उलवे सेक्टर 6 प्लॉट नं 2 अनंता टॉवर येथे श्री एकविरा कृपा इंटरनेट केबल सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. सागर शशिकांत ठाकूर यांनी सुरु केलेल्या या नवीन व्यवसायाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी त्यांनी शशिकांत ठाकूर यांचे अभिनंदन करून त्यांना व्यवसायाच्या पुढील यशस्वी वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, सागर ठाकूर, अमर म्हात्रे, निलेश खारकर, सचिन घरत, निकिता खारकर, अमित नाईक, अनुप भगत, धीरज ओवलेकर, वितेश म्हात्रे, अस्मिता भगत, मानसी ठाकूर, पारुबाई नाईक, अंकुश ठाकूर, राजा देवेंद्रन, शशिकांत ठाकूर, सनी देवेंद्रन, महादेश देवेंद्रन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper