कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत नगर परिषद निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाणार्या शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीच्या संकल्पनामा आणि वचननाम्याचे प्रकाशन मंगळवारी (दि. 25) पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप रायगड जिल्हा निवडणूक प्रभारी व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. स्वाती लाड आणि नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
या वेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार थोरवे यांनी कर्जत शहरात तब्बल 119 कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगून स्थानिक पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक उपक्रम अशा अनेक समस्यांवर वेळोवेळी लक्ष देऊन उपाययोजना केल्याचे नमूद केले. विकासकामे हीच आमची ओळख असून जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Check Also
साऊंड सिस्टिम व्यावसायिकांना नियमांच्या चौकटीत व्यवसायाची संधी द्यावी
असोसिएशनचे आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन; सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्तआगामी दहीहंडी, …
RamPrahar – The Panvel Daily Paper