Breaking News

आक्कादेवी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली जंगल सत्याग्रह झालेल्या आक्कादेवी माळरानाच्या धरणावर रविवारच्या सुटीनिमित्त उरण, पनवेल व नवी मुंबई येथील पर्यटकांनी धरणात पोहण्याबरोबर धरणातून फेसळणार्‍या पाण्यावर रोमहर्ष मजा लुटण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. यामुळे आक्कादेवी धरण परिसर पर्यटकांनी बरसल्याचे चित्र निर्माण झाले होते. मागील 11 दिवस पावसाने कोकण विभागासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढल्यानंतर पावसाची उसंती मिळाल्याने आणि अनेक ठिकाणच्या धरणांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने बहुतांशी धरण व धबधब्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना मज्जाव करण्यात आल्याने व चिरनेर येथील या आक्कादेवी धरणाची खोली अधिक खोल नसल्याने विशेषतः पर्यटकांना जिवीत हानी होण्याची भिती नसल्याने उरण, पनवेल व नवीमुंबई परिसरातील पर्यटकांनी पावसाळ्यातील धबधब्याची मजा लुटण्यासाठी आपले मोर्चे उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगल सत्याग्रहाच्या ठिकाणच्या आक्कादेवी धरणाला अधिक पसंती देत आहेत. जंगल सत्याग्रह झालेल्या आक्कादेवीच्या माळरानालगतच हे छोटेशे धरण साकारण्यात आले असून चिरनेर येथील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मारकाचे दर्शन येथे येणार्‍या पर्यटकांना घडते. उत्तर, पूर्व आणि दक्षिण या तीन बाजूच्या दिशांना नैसर्गिक लाभलेल्या डोंगर – झाडी व माध्यस्थानी आक्कादेवी धरण असा निसर्गरम्य परिसर आणि हुतात्म्यांची भूमी गोळीबार झालेले मुख्य ठिकाण आहे. यामुळे रविवारखेरीजही इतर दिवशीही पर्यटकांनी रेलचेल धरण ओसांडून वाहू लागल्या पासूनच कायम सुरूच आहे, मात्र रविवारच्या सुटीनिमित्त आक्कादेवी धरण परिसर पर्यटकांनी बरसला असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply