पनवेल : रामप्रहर वृत्त
पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रो. जोगेंद्र कवाडे यांच्या आदेशाने पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025-26 करीता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस, आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाचे कार्यकर्ते सक्रियपणे काम करतील, असा विश्वास पीआरपीचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांनी दिला आहे.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper