पनवेल : रामप्रहर वृत्त
शरीर आणि मन दोन्ही सुदृढ होण्यासाठी खेळाची नितांत गरज असून कुस्ती हा खेळ या दोन्ही आघाड्यांवर उत्तम काम करतो. त्यामुळे नितळस येथे सुरू झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुल हे तरुणांच्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
पनवेल तालुक्यातील नितळस येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे उद्घाटन गुरुवारी (दि. २) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी कुस्ती संकुलाला अधिक उभारी देण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी जाहीर करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या भव्य आणि सुसज्ज कुस्ती संकुलामुळे ग्रामीण भागातील मल्लांना आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. संकुलाची प्रगती अधिकाधिक चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे संकुल खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवेल आणि येथून कसलेले पैलवान घडतील.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप नेते एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, पंचायत समिती सदस्य आरती काठे, नगरसेवक हॅप्पी सिंग, दिनेश खानावकर, नितेश पाटील, नगरसेविका विजयश्री पाटील, अखिल भारतीय माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भोईर, विनोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रभाकर पाटील, नाथाशेठ आगलावे, दीपक उलवेकर, अंकुश पाटील, प्रकाश खैरे, किरण दाभणे, बाळकृष्ण पाटील, बिना गोगारी, यतीन पाटील तसेच संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान रूपेश पावशे, शालिक पावशे, चंद्रकांत पावशे, धर्मा पावशे, गुरूनाथ पावशे, कैलास पावशे, क्षितिज म्हात्रे, दर्शना पावशे, कुणाल काटे, महिला पैलवान अमोघा घरत, दिशा घनवट, अस्मिता मोरे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …
RamPrahar – The Panvel Daily Paper