Breaking News

महापौर नितीन पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची सदिच्छा भेट

फेरीवाले, अतिक्रमण व वाहतूक कोंडीवर चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी सोमवारी (दि.६) नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पनवेल महानगरपालिका हद्दीतील फेरीवाले व इतर अतिक्रमणे, वाढती वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विविध संवेदनशील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील प्रमुख मार्गांवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, वाहतुकीवरील ताण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत सकारात्मक संवाद झाला.
यावेळी भाजप खारघर अध्यक्ष नगरसेवक प्रवीण पाटील व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उमेश इनामदार उपस्थित होते. शहरातील नागरिकांना सुरक्षित, सुटसुटीत व शिस्तबद्ध वातावरण मिळावे यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Check Also

पनवेल तालुक्यातील भाताण येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील भाताण ग्रामपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत निधीतून मंजूर करण्यात आलेल्या …

Leave a Reply