Breaking News

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त
जगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. ६) पक्षाच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. १९८० साली स्थापन झालेल्या या पक्षाने गेल्या अनेक दशकांत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि जनकल्याणासाठी सातत्याने कार्य केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पक्षाच्या ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तसेच पक्षाच्या संस्थापकांचे आणि देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणीप्रती निष्ठा राखण्याचा आणि समाजसेवेचा संकल्प पुन्हा दृढ केला. एकमेकांना पेढे वाटून स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेलचे महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत यांनी आपल्या भाषणात भाजपच्या प्रवासाचा आढावा घेतला आणि पक्षाने देशाच्या विकासात बजावलेली भूमिका अधोरेखित केली. भाजपचा स्थापना दिवस हा केवळ एक औपचारिक सोहळा नसून कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा, निष्ठा आणि सेवा भावनेचा नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याचे, संघटन बळकट करण्याचे आणि शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले तसेच प्रितम म्हात्रे यांनी आजपासून सात दिवस रोजगार सप्ताह आयोजित करण्यात आल्याचे सांगून या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी दिली जाणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष नगरसेविका रूचिता लोंढे, प्रीती जॉर्ज, श्वेता भोईर, माजी नगरसेवक सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, अनुराधा ठोकळ, सारिका भगत, नलिनी शेलार, सुलोचना कल्याणकर, सुहासिनी शिवणेकर, सपना पाटील, लीना पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, केदार भगत, रूपेश नागवेकर, निलेश म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भाजप स्थापना दिनानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या घरांवर पक्षध्वज फडकावले असून पक्ष कार्यालयांना आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Check Also

आपटा घेरावाडी येथे बोअरवेल आणि सोलर पंपाचे लोकार्पण

रसायनी : रामप्रहर वृत्तदुर्गम भागामध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य असून नागरिकांच्या समस्या …

Leave a Reply