Breaking News

बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी

उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 7) झाले.

या वेळी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. डेव्हिड अल्वारीस, उपाध्यक्ष रवींद्र भगत, शिवकुमार के. के., खजिनदार नरेंद्र जोशी, युवा नेते किशोर पाटील, सुधीर ठाकूर आदी उपस्थित होते.

रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे तीन दिवसीय आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत 450 खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही स्पर्धा 11, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील मुले गट,  11, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील मुली गट, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील दुहेरी मुले, 13, 15, 17 व 19 वर्षांखालील दुहेरी मुली गट, 17 वर्षाखालील दुहेरी मिश्र गट, खुला गट महिला व पुरुष, मिश्र दुहेरी अशा विविध गटांत होत आहे.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 9 जून सायंकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, सचिव सुंदर शेट्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply