पनवेल ः प्रतिनिधी
शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पनवेल शहरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कादिरभाई कच्छी यांचे फलक झळकल्याने पनवेलकरांकडू आश्चर्य व्यक्त होत आहे.
माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर पालिकेची परवानगी न घेता शुभेच्छा फलक आणि पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्यांमध्येच गुन्हेगार कादिरभाई कच्छी यांनीही शेकापशी असलेली आपली जवळीक दाखविण्यासाठी माजी आमदार पाटील यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.
कादिरभाईला एका गुन्ह्याच्या प्रकरणात हरियाणाचे पोलीस पनवेलमध्ये शोधत आले होते याचीही आठवण हे फलक पाहणार्या सर्वांना झाली.
राजकारणातील साधनशुचितेचे धडे इतरांना देणार्या शेकापने मात्र स्वतःपासून त्याची सुरुवात करणे आवश्यक आहे, अशी चर्चा पनवेलकर करीत आहेत.
विवेक पाटील यांच्या फोटोएवढाच फोटो फलकावर टाकून कादिरभाई कच्छी जनतेला काय सुचवू इच्छितात, याचीही चर्चा सुरु आहे.