Breaking News

अभिमानाने सांगा “मै भी चौकीदार हूँ!”

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुरक्षा रक्षकांना आवाहन

पनवेल ः प्रतिनिधी

सरकारी मालमत्तेची राखण करणं ही चौकीदारी नाही का, असा सवाल विचारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार म्हणून खालच्या पातळीवर टीका झाली. पण त्यांनी देशाचा चौकीदार म्हणून केलेले काम जनतेसमोर आहे. कराची चुकवेगिरी नोटबंदी, जीएसटीमुळे थांबली.

चौकीदार म्हणून पंतप्रधानांनी केलेले हे काम कौतुकास्पद आहे. तुम्हीही अभिमानाने सांगा ’मै भी चौकीदार हूॅ‘ असे आवाहन सुरक्षा रक्षकांना सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांना भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल आयोजित सत्कार सोहळ्यात केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही सर्वांनी पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट केले व चौकीदारावर आरोप करणार्‍यांना उत्तर दिले. हा जनतेने दिलेला महत्त्वाचा कौल आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्केट यार्डमध्ये रविवार (दि.23) भाजप कामगार आघाडी रायगड जिल्हा, जय भारतीय जनरल कामगार संघटना, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेतर्फे जिल्हा सुरक्षा रक्षकांना भरघोस पगारवाढ मिळवून दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशांत ठाकूर बोलत होते.

सुरक्षा रक्षकांना वेतवाढ मिळावी, यासाठी तीनही संघटनांचे अध्यक्ष जितेंद्र घरत व त्यांच्या सहकार्‍यांनी पाठपुरावा केल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. पनवेल महानगरपालिकेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सदस्य घेण्याचा प्रस्ताव आला तेव्हा महापौर डॉ. कविता चौतमल यांनी रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचे सदस्य घेण्याचा व सध्या असलेल्या सुरक्षा रक्षकांना कायम करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल प्रशांत ठाकूर यांनी महापौर डॉ. चौतमोल यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला सहाय्यक कामगार आयुक्त आनंद भोसले, भाजप कामगार जिल्हा आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र भगत, रवी नाईक, पांडुरंग पाटील, मोतीलाल कोळी, रवींद्र कोरडे, विनायक कोळी, शेखर तांडेल, समीराताई चव्हाण, विवेक अभ्यंकर, ज्ञानेश्वर साखरे आदी उपस्थित होते.

नेत्याच्या प्रॉपर्टीत नातेवाईकांसह माळी, चालकही भागीदार

दक्षिण रायगडमधील एक नेत्याने माळी, काका, चालक, भावाच्या, मामाच्या नावावर जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, अशी चर्चा असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. नोटबंदीमुळे कर चुकविणार्‍या अनेक उद्योगपतींचे वांदे झाले असे सांगून आता जीएसटीमुळे कर जमा होण्यात वाढ झाल्याचेही स्पष्ट केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply