Breaking News

वावंढळ तलाव गाळमुक्त कधी होणार?

रसायनी : वार्ताहर

वावंढळ येथे शिवकालीन तलाव असून त्यात विहीर घेऊन कोयना प्रकल्पग्रस्त जनतेला नळपाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे. ही योजना करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तलावाची खोली वाढविण्यासाठी व बांधबंदिस्त करण्याची सूचना करण्यात आली होती. त्याकडे पुनर्वसन विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने तलाव मार्च महिन्यातच कोरडा पडतो, गेली पाच वर्षे पाणीपुरवठा योजना खंडित झाली आहे. ग्रामपंचायतीने यात लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.या तलावाच्या दुरुस्तीबाबतीत मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकारी रायगड व जिल्हा परिषद रायगड यांना सूचना दिल्या आहेत, मात्र तिथूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही अथवा माहिती मिळाली नाही. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वखर्चाने तलावातील गाळ काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पाऊस सुरू झाल्याने ते काम थांबले. त्यानंतर पुन्हा प्रयत्न झाला. दुर्दैवाने या तलावात खडक असल्याने हे कामही अर्धवट राहिले. आता काढलेला गाळ तलावात तसाच गेली तीन वर्षे पडून आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम होईल, असे सरपंचांनी सांगितले, मात्र काम झाले नाही. तलाव दुरुस्तीचे काम मंजूर झाल्याची दोन वर्षे चर्चा सुरू आहे, पण हे काम स्थगित का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Check Also

टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषची कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन अन्‌‍ शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …

Leave a Reply