Breaking News

आवरे ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजपा युतीचा झेंडा

उरण ः प्रतिनिधी

उरण तालुक्यातील आवरे ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या निरा सहदेव पाटील यांनी थेट सरपंचपदी बाजी मारली. शेकापच्या उमेदवार अमृता धनेश गावंड यांचा 850 मताधिक्याने पराभव करीत 2038 मते मिळवून आवरे ग्रामपंचायतींमध्ये त्या दणदणीत मतांनी विजयी झाल्या आहेत.

आवरे ग्रामपंचायतीमधील गेली अनेक वर्षांच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग लावून शेकाप सोबत या निवडणुकीत आघाडीत असलेल्या काँग्रेसलाही धक्का देऊन शिवसेनेच्या निरा सहदेव पाटील यांनी दणदणीत मतांनी विजय संपादन करून शिवसेना-भाजपाचा भगवा फडकविला आहे.

तर प्रभाग क्रं.1 मधून चेतन म्हात्रे, जयश्री गावंड हे सदस्यपदी निवडून आले आहेत.प्रभाग क्रं.2 मधून भाजपाच्या स्वाती गावंड, कमल गावंड व शिवसेनेचे गुरुनाथ गावंड हे उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्रं 3 मधून काँग्रेसच्या गीतांजली गावंड, सविता गावंड व अविनाश गावंड यांनी सदस्यपदी विजय संपादन केला असून प्रभाग क्रं 4 मध्ये शिवसेनेच्या सोनाली म्हात्रे,भाजपाच्या प्रणाली म्हात्रे व काँग्रेसचे समाधान म्हात्रे हे सदस्यपदी निवडून आले आहेत. प्रभाग क्रं.5 मधून शिवसेनेचे संतोष पाटील व भाजपाचे अनिल म्हात्रे सदस्यपदी विराजमान झाले असून थेट सरपंचासह एकूण 5 प्रभागांमध्यें शिवसेनेला 3 भाजपा 3 शेकाप 3 आणि काँग्रेस 4 सदस्यांचे संख्याबळ असून, थेट सरपंच पदाच्या पाहिल्याच निवडणुकीत आवरे मधिल शिवसेना-भाजपा आणि पाले प्रभाग क्रं 4 मधील काँग्रेस-भाजपा-शिवसेना आघाडीने सरपंच पदाच्या निरा पाटील यांना तारल्याने आवरे ग्रामपंचायतीवर शेकापची अनेक वर्षे असलेली सत्ता हातून गेल्याने हा पराभव शेकापच्या जिव्हारी लागला आहे. 

शेकापच्या अनेक वर्षांच्या सत्तेला कंटाळून मतदारांनी आम्हाला कौल दिला असून, येथील जनतेने परिवर्तनातुन केलेली निवड सार्थकी लावणार असल्याची प्रतिक्रिया आवरे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित थेट सरपंच पदी निवडून आलेल्या निरा सहदेव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 या आवरे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदी निवडून आलेल्या निरा पाटील यांचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर,पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, हिराजी घरत यांनी अभिनंदन केले असून,त्याचे चिरंजीव यशवंत पाटील,आवरे शाखा प्रमुख सुनिल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक निकालानंतर उरणमध्ये मोठ्ठा जल्लोष केला.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply