Tuesday , March 28 2023
Breaking News

श्रीलंकेचा आफ्रिकेवर ऐतिहासिक मालिका विजय

पोर्ट एलिझाबेथ : वृत्तसंस्था

ओशाडा फर्नाडो आणि कुशल मेंडिस यांनी झळकावलेल्या शानदार नाबाद अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांची ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका हा पहिला आशियाई, तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतरचा जगातील तिसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 128 धावांत संपुष्टात आणल्यानंतर कुशल मेंडिसने नाबाद 84 धावांची खेळी साकारत श्रीलंकेला तिसर्‍याच दिवशी विजय मिळवून दिला. फर्नाडोने मेंडिससह शतकी भागीदारी रचत श्रीलंकेच्या विजयात मोलाचा हातभार लावला. फर्नाडोने नाबाद 75 धावा फटकावल्या.

– संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका (पहिला डाव) 222, श्रीलंका (पहिला डाव) 154, द. आफ्रिका (दुसरा डाव) 128, श्रीलंका (दुसरा डाव) : 45.4 षटकांत 2 बाद 197 (कुशल मेंडिस नाबाद 84, ओशाडा फर्नाडो नाबाद 75; कॅगिसो रबाडा 1/53). सामनावीर : कुशल मेंडिस, मालिकावीर : कुशल परेरा.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply