Breaking News

रस्त्यावर अश्लील चाळे करणार्या महिलांवर कारवाई

पुणे : प्रतिनिधी

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे  करून पुरुषांना आकर्षित करीत वेश्याव्यवसाय करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.  याबाबत फरासखाना पोलिसांनी एक वेगळे पाऊल उचलले असून भडक मेकअप करून रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे करणार्‍या महिलांवर कलम 294 अन्वये कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. एका आठवड्यात अशा आठ महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे़. बुधवारपेठेत अनेक महिला रस्त्यावर उभ्या राहून वेश्याव्यवसाय करतात़. त्यामुळे अशा रस्त्यावरून जाण्यास महिला तसेच पुरुषही टाळतात़. या महिला भडक मेकअप करून शरीराचा काही भाग अर्धवट उघडा ठेवून येणार्‍या -जाणार्‍या लोकांकडे पाहून हातवारे व अश्लील चाळे करतात. अनेकदा अश्लील बोलतानाही आढळून येतात. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी सांगितले की, या परिसरात न राहणार्‍या काही महिला बुधवारपेठेत रस्त्यावर थांबून वेश्याव्यवसाय करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply