Saturday , March 25 2023
Breaking News

‘रामप्रहर’वर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या दैनिक ‘रामप्रहर’चा 11वा वर्धापन दिन गुरुवारी (दि. 18) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

वर्धापन दिनानिमित्त ’रामप्रहर’च्या कार्यालयात श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेत्या शकुंतला ठाकूर, मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, महिला मोर्चा  जिल्हा अध्यक्ष कल्पना राऊत, तालुका अध्यक्ष व पं. स. सदस्या रत्नप्रभा घरत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, श्रीवर्धन मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक, मनपा प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, कुसुम म्हात्रे, ‘रामप्रहर’चे मालक, मुद्रक, प्रकाशक कृष्णाशेठ ठाकूर, संचालक स्वप्नील ठाकूर, भार्गव ठाकूर, ‘टीआयपीएल’चे अनिल देशमुख, अरुण नाईक, विभागीय माहिती अधिकारी गणेश मुळ्ये यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, हितचिंतकांनी या वेळी उपस्थित राहून रामप्रहर टीमला शुभेच्छा दिल्या.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply