Breaking News

तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व

ढाका : वृत्तसंस्था

बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझा मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे मोर्तझाच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

26 ते 31 जुलैदरम्यान कोलंबोत रंगणार्‍या या एकदिवसीय मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी अष्टपैलू शाकिब अल हसन आणि लिटन दास यांना विश्रांती देण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला होता, परंतु आता 35 वर्षीय मोर्तझाही खेळणार नसल्याने बांगलादेशच्या चिंतेत भर पडली आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू मोहम्मद सैफुद्दीनसुद्धा पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेला मुकणार असून, तस्किन अहमद आणि फर्हाद रझा यांची निवड झाली आहे.

-डिकवेल्ला, धनंजयाचे पुनरागमन

कोलंबो : मायदेशात होणार्‍या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी धडाकेबाज डावखुरा फलंदाज निरोशन डिकवेल्ला आणि जादूई फिरकीपटू अकिला धनंजया यांच्यासह तब्बल 10 खेळाडूंचे श्रीलंकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. सुरंगा लकमल, जीवन मेंडिस, दिनेश चंडिमल हे खेळाडू मात्र 22 जणांच्या चमूत स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.श्रीलंकेचा संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), निरोशन डिकवेल्ला, कुशल परेरा, अविष्का फर्नाडो, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरिमाने, थिसारा परेरा, धनंजय डी’सिल्व्हा, लक्षण संदाकन, अकिला धनंजया, दामुष्का गुणतिलका, दसून शनका, लसिथ मलिंगा, नुवान प्रदीप, कसून रजिथा, लाहिरू मदुशंका, इसुरू उडाना, अमिलो अपोन्सो, शिहान जयसूर्या, वाहिदू हसरंगा, लाहिरू कुमारा.

Check Also

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन

विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …

Leave a Reply