Breaking News

नेरळमध्ये जम्बो पक्षप्रवेश

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 439 कार्यकर्ते भाजपत

कर्जत ः बातमीदार

केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत भाजपच्या विचारांचे सरकार आले पाहिजे, हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असून आता नेरळ गावात पुन्हा सुवर्णकाळ येईल, असा आशावाद रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला, तर नेरळ गावासाठी नळपाणी योजना तत्काळ मंजूर केली जाईल आणि कचर्‍याचा प्रश्नदेखील घनकचरा प्रकल्प आणून सोडवला जाईल, असे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.

नेरळमधील ऋषभ गार्डन सभागृहात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे सोमवारी (दि. 22) आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर कर्जतचे माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शरद म्हात्रे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका संपर्कप्रमुख विनोद साबळे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, रायगड जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अशोक गायकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष मृणाल खेडकर, महिला मोर्चा कर्जत तालुका अध्यक्षा सुनंदा भोसले, किरण ठाकरे यांच्यासह आयोजक नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी कर्जत तालुका पंचायत समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश मसणे, नेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश म्हसकर यांच्यासह राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष रवि मसणे, अश्वपाल संघटना अध्यक्ष संतोष शिंगाडे,

शेकाप नेरळ शहराचे माजी चिटणीस प्रकाश पेमारे, शेलू ग्रामपंचायत सदस्य रेश्मा मसणे, दीपक शेकटे, दिनेश नीमणे, माजी सदस्य रमेश वाघ, पांडुरंग कुंभार तसेच नेरळमधून कल्याण केंद्रे, नेरळ रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष संदीप म्हसकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघ, नरेश पवार तसेच मोहाचीवाडी, कुंभारआळी, राजेंद्रगुरूनगर, लव्हाळवाडी, टपालवाडी, बेडीसगाव, ममदापूर ग्रामपंचायत सदस्य एजाज, नंदू वाघ, जयराम वाघ, प्रवीण ब्रह्मांडे, दत्ता ठमके, निलेश माळी, संजय चतुरे, रोशन राणे आदींसह इंजिवली येथील भानुदास देशमुख, गौरकामत येथील निलेश देशमुख, गुंडगे येथील कृष्णा कांबळे, खाडेपाडा येथील राजा खाडे, वांजळे येथील महेश ठाकरे, मालेवाडी मारुती भोईर आदींसह 439 कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

प्रास्ताविक भाजप प्रज्ञा प्रकोष्टचे कोकण संघटक नितीन कांदळगावकर यांनी केले. तालुका चिटणीस प्रवीण पोलकम, रायगड जिल्हा ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, जिल्हा उपाध्यक्ष संतोष भोईर, राहुल मुकणे, माजी नगराध्यक्ष बबिता शेळके, भाजप महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष वर्षा बोराडे, नेरळ महिला अध्यक्ष नीता कवाडकर, सुशील सुर्वे, अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल हक नजे, पक्ष कार्यालय प्रमुख परशुराम म्हसे, मिलिंद साने, बळवंत घुमरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दादा गायकवाड, आनंद सुगवेकर, नारायण सुर्वे, मनमोहन अग्रवाल, भडसावळे हेही उपस्थित होते. नेरळ शहर सरचिटणीस नम्रता कांदळगावकर यांनी शेवटी आभार मानले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply