Breaking News

युवक मंडळाकडून मुंगोशी येथे वृक्षारोपण

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील मुंगोशी गावामधील युवक मंडळाच्या पुढाकाराने रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत गावाजवळील मुंगोशी फाटा ते पूल दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस 200 झाडे लावण्यात आली. त्यासाठी युवक, ग्रामस्थ व महिलांनी श्रमदान केले. सुरुवातीस खड्ड्याचे व झाडांचे तसेच त्यासाठी लागणारे  कुदळ, फावडा, घमेले, पहार, कोयता या साधनांची सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे तसेच गावातील युवक मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ प्रतिनिधींनी पूजन केले. त्यानंतर वृक्षरोपणास प्रारंभ करण्यात आला. युवक मंडळाने खड्डे खोदणे व झाडे लावण्याची जबाबदारी घेतली तर महिला मंडळाने या झाडांना मातीची भर घातली. झाडांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्रामस्थांनी प्रत्येक झाडास कुंपण करून त्याच्याभोवती नेटची जाळी लावण्याचे काम केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply