Breaking News

विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता संपूर्ण जगभर आहे. अशा भारताचे नेतृत्व करीत असलेल्या मोदींच्या भारतीय जनता पक्षाचे तुम्ही सदस्य झाले आहात. यापुढे आपली समस्या ती आमची आणि ती सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते रविवारी (दि. 4) कामोठे येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी रवी जोशी यांच्या नेतृत्वाखाली या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अनिल भगत, नितीन पाटील, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, जगदिश गायकवाड, तसेच रवी जोशी, युवा नेते के. के. म्हात्रे, राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील, हॅप्पी सिंग आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या जनतेपर्यंत पोचविण्याचे काम आता तुम्हा-आम्हा सर्वांचे आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचे प्रकल्प आपल्या विभागात होत आहेत. मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, कॉरिडॉर अशी विकासाची अनेक कामे सरकार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सब का साथ, सब का विकास, या घोषवाक्याप्रमाणे तुम्ही भाजपला साथ दिल्यास विकास निश्चित आहे.

आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, आमदार निधीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी पनवेल मतदारसंघात आणला आहे. भाजप सरकारही शहर, गाव प्रत्येकासाठी काम करीत आहे. आपण कामोठेवासीयांनी भाजपमध्ये प्रवेश केलात. तुमच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडविल्या जातील. याकरिता येत्या काही दिवसांत कामोठ्यामध्ये सेक्टरनिहाय समस्या जाणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोची जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर तुमच्या समस्या सोडविण्यासाठी दिली आहे. या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. रवी जोशी कामोठ्यातील धडाडीचे  कार्यकर्ते आहेत, असे सांगून त्यांनी आज जो पक्षप्रवेश आयोजित केला त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे कौतुक केले.

नगरसेवक जगदिश गायकवाड यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे म्हटले.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत रवी जोशी यांनी 25 हजारांचा धनादेश आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे या वेळी सुपूर्द केला.

या कार्यक्रमात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून राहुल शेंडगे, हर्षद लुबाल, आशिष काळे, निलेश काळे, शिवजा काळे, योगेश काळे, संतोष आलंदर, प्रवीण वाघ घोडे, विश्वनाथ गायकवाड, अजय हिरवे, विष्णू चोपडे, अप्पासाहेब पवार, तुळशीराम काळे, प्रकाश पवार, गणेश कवडे, नितीन कवडे, मनोज कवडे, प्रतीक कवडे, महेश कवडे, आकाश कवडे, विजय गार्डे, प्रकाश गार्डे, संभाजी गार्डे, संगम गार्डे, राजू गार्डे, संदीप पाचपुते, विश्वनाथ फडतरे, सुरेश कड, अक्षय कड, शिवाजी आहेर, रूपाली खिलारी, ज्योती गार्डे, प्रियांका आहेर, कुंड आहेर, निर्मला कड, सारिका फडतरे, दत्ता कड आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply