Breaking News

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

कृष्णा कोबनाक व जनसंकल्प प्रतिष्ठानचे आयोजन; विद्यार्थ्यांचा गुणगौरव

म्हसळा ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 10) म्हसळा येथे जनसंकल्प प्रतिष्ठानमार्फत 10वी, 12वी व पदवीधर विद्यार्थी यांच्याकरिता स्पर्धा परीक्षा फ्री सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सेमिनारला प्रमुख मार्गदर्शक प्रा. विकास सावंत उपस्थित होते. अतिशय सुंदर शब्दांत विद्यार्थी वर्गाला त्यांनी प्रबोधन केले.  कोकणातील युवक स्पर्धा परीक्षांमध्ये का अपयशी होतात, यांची कारणे थोडक्यात सांगितली. आपण जीवनात काय करायचे, हे आपण ठरवले की आपण तयारी करतो. म्हणून आपण प्रथम काय बनायचे हे आधी ठरवावे, असे सांगितले. कृष्णा कोबनाक यांनी राजकीय व सामाजिक कार्याबाबतीत अनुभव कथन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे, जिद्द, चिकाटी व संघर्ष करूनच यशस्वी होऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण मी आहे, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी कश्मीर बाबतीत कलम 370 रद्द केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. येथे 10वी, 12वी परीक्षा पास झालेल्या सर्व विद्यार्थी यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह संस्थेमार्फत देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक सचिव अमित कोबनाक, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस महेश पाटील, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक प्रकाश कोठावले, वसंत शेडगे, राकेश हेंलोडे, भाजप सरचिटणीस तुकाराम पाटील, शरद चव्हाण, आनंद कोबनाक, दिलीप कोबनाक, मीनाताई टिंगरे, जयसिंग बेटकर, मंगेश मुंडे, अनिल टिंगरे, सुनील शिंदे, विश्वनाथ कदम, दिनेश काप, प्रशांत महाडिक, प्रल्हाद महाडिक, समीर धनसे अशा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा सेमिनार यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply