Breaking News

उसर्ली शाळेत वह्यावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत उसर्ली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्याच्या कार्यक्रमचो आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत उसर्ली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मंडळाच्यावतीने वह्यावाटप करण्यात आल्या. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पळस्पे पंचायत समिती अध्यक्ष अजय तेजे, युवामोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, कोन ग्रामपंचायत सरपंच नीलेश म्हात्रे, पांडुरंग केणी, सुनिल गवंडी, अप्पा भागीत, घनश्याम पाटील, संतोष पाटील, विजय भगत, मच्छींद्र पाटील, गणेश भगत, प्रमोद भगत, संजय भगत, जयंवत भगत, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply