Breaking News

ऑनलाइन दिसणार आरक्षण यादी रेल्वेची नवी सेवा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

विमान प्रवासाप्रमाणे आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार सीट निवडता यावं यासाठी ‘ऑनलाइन चार्ट’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच उपलब्ध असलेल्या आसनांबाबत अर्थात आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल. रेल्वेच्या या नव्या सेवेद्वारे प्रवाशांना गाडीच्या डब्याची सचित्र माहिती (ग्राफिकल प्रेझेंटेशन) तसेच बर्थनुसार तपशील मिळणार आहे. यासाठी रेल्वेची वेबसाइट हीींिं://ुुु.ळीलींल.ले.ळप वर उक-ठढड / त-उ-छउध असा एक नवा पर्याय सुरू करण्यात आला आहे. या नव्या सेवेद्वारे आरक्षित केलेल्या जागा आणि उपलब्ध असलेल्या जागा वेगवेगळ्या रंगांनी दाखविल्या जाणार आहेत. मोबाईल इंटरनेटवरही ही यंत्रणा उपलब्ध असणार आहे. यामुळे रेल्वे तिकीट आरक्षणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असं केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले. येत्या 20 दिवसांमध्ये ही सुविधा शताब्दी आणि राजधानी गाड्यांना उपलब्ध होणार आहे. उपलब्ध आसनांबाबत ऑनलाइन माहिती उपलब्ध असेल. त्यामुळे तिकीट तपासनीसला शोधण्याची गरज राहणार नाही. ही यंत्रणा सगळ्या गाड्यांबाबत उपलब्ध करण्यात आली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply