Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जलतरणपटू प्रभात कोळीचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला नुकताच तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी खासदार लोकनते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रभातचा बुधवारी सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यास सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उलवे नोड-2 अध्यक्ष विजय घरत, वसंतशेठ पाटील, विनोद साबळे, प्रभाकर जोशी, राजू कोळी, विश्वनाथ कोळी, विजय पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रभातचे कौतुक केले व त्याला रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीने एक लाख एक हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही प्रभातचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply