Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय बुधवार (दि. 11)पासून सेवेदाखल होत असून, या रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता होणार आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रुग्णालयासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, आमदार निरंजन डावखरे, मनोहर भोईर, भरत गोगावले, सुरेश लाड, जयंत पाटील, अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, धैर्यशील पाटील, सुभाष पाटील, अवधूत तटकरे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती, तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आदी मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासासाठी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. त्या अनुषंगाने येथील विकासाला झपाट्याने वेग आला आहे. बुधवारी लोकार्पण होणारे पनवेल उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर त्यातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांची वचनपूर्ती

रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातांतील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व पाठपुराव्यातून पनवेल येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले. रुग्णालय उभारणीपासून ते पूर्ण होईपर्यंत आमदार ठाकूर यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासकीय मान्यता, खर्चास मंजुरी, कामाची पाहणी व त्याचा आढावा घेण्याबरोबरच विधिमंडळातही यासंदर्भात आवाज बुलंद केला होता. त्यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश येऊन या रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी होत आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply