Breaking News

महेश बालदी यांच्याकडून आदिवासी मुलाला लॅपटॉप

उरण ः रामप्रहर वृत्त

रानसई आदिवासी वाडीमध्ये राहणारा विकास नारायण बरतोड हा सिव्हिल  इंजिनिअरिंगला असून त्याला शिक्षणाची आवड आहे. त्यास प्रोजेक्टसाठी लॅपटॉपची गरज होती, पण लॅपटॉप घेण्याइतकी त्याची परिस्थिती नाही. ही बाब जेव्हा भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष समीर मढवी यांना रानसईच्या सरपंच गीता भगत यांचे पती अनिल भगत व बूथ अध्यक्ष श्याम लेंडे यांच्याकडून समजली असता त्यांनी ही समस्या जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांना सांगितली. त्यांनी दोन दिवसांत या मुलाला लॅपटॉप घेऊन दिला.

या वेळी भाजप युवा अध्यक्ष समीर मढवी, जासई विभाग अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, जासई गाव अध्यक्ष सुनील घरत, रानसईचे अनिल भगत, अध्यक्ष शाम लेंडे आदी उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply