Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा होणार समारोप

नाशिक : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 19) नाशिकमध्ये येत असून, येथे त्यांची भव्य सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप होईल. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप रणशिंग फुंकून शक्तिप्रदर्शन करणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळवलेले यश पुन्हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळावे यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना भाजपने केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेची घोषणा केली होती.

महाजनादेश यात्रेचा प्रारंभ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून 1 ऑगस्टला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झाला होता. दुसर्‍या टप्प्याच्या यात्रेच्या समारोपाला सोलापुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती लाभली, तर या यात्रेचा अंतिम टप्प्यातील समारोप गुरुवारी नाशिकच्या तपोवनमधील साधुग्राम येथे होत आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यामुळे भाजपने जोरदार तयारी केली आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply