Breaking News

खारघर मुर्बी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कळंबोली : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असून, त्याअंतर्गत खारघर मुर्बी येथील ठाकूर परिवारासह शेकडो कार्यकर्त्यांनी  संतोष गोपीनाथ ठाकूर आणि अनिरुद्ध नारायण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन झालेल्या या पक्षप्रवेशामुळे खारघरमध्ये भाजपची शक्ती वाढली आहे.

या वेळी संतोष गोपीनाथ ठाकूर, अनिरुद्ध नारायण ठाकूर यांच्या मार्गदनाखाली नरेश विठ्ठल ठाकूर, मेघनाथ गोपीनाथ ठाकूर, जयगुण कृष्णा म्हात्रे, विश्वासराव पुंडलिक पाटील, विठ्ठल जानु ठाकूर, जनार्दन सोंग्या म्हात्रे, सदाशिव नारायण ठाकूर, महादेव गणपत मढवी, सुधाकर गजानन पाटील, आत्माराम पुंडलिक गायकर, संजय विठ्ठल ठाकूर, राजेश विठ्ठल ठाकूर, प्रदीप अनिरुद्ध ठाकूर, संदेश विठ्ठल ठाकूर, महेंद्र विठ्ठल ठाकूर, विनोद भगवान ठाकूर, छत्रपती सदाशिव ठाकूर, पंढरीनाथ गोपीनाथ ठाकूर, रूपेश अनिरुद्ध ठाकूर, विशाल भगवान ठाकूर, बंटी नरेश ठाकूर, जितेश सदाशिव ठाकूर, दत्ता सुरेश ठाकूर, आजिंक्य पंडित ठाकूर, विक्की नरेश ठाकूर, निलू संजय ठाकूर, गणेश किसन ठाकूर, शुभम संजय ठाकूर, देवेश संतोष ठाकूर, प्रेम संतोष ठाकूर, कुणाल मेघनाथ ठाकूर, निकेश संतोष खानावकर, रोहित संतोष खानावकर, सुशांत अरुण ठाकूर, प्रथम प्रदीप ठाकूर, प्रणीत राजेश ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply