युचर ग्रुप बिग बाजार येथे जय भारतीय जनरल कामगार संघटनेची स्थापना

पनवेल ः रामप्रहर वृत्त

येथील युचर ग्रुप बिग बाजार पनवेल येथे जय भारतीय जनरल कामगार  संघटनेची स्थापना झाली. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी सांगितले की, बिग बाजार पनवेल येथील कामगारांच्या काही समस्या व मागण्या होत्या. ते ज्या संघटनेत काम करत होते, त्या भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून पूर्ण होत नव्हत्या, त्यामुळे बिग बाजारमधील काम करणारे 40 ते 50 कामगार मला भेटून त्यांच्या समस्या माझ्यापुढे मांडल्या. या सर्व समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्व कामगारांनी संघटनेचे फॉर्म भरून भारतीय कामगार सेनेचे राजीनामे सादर केले, असेही घरत यांनी सांगितले.

बिग बाजार येथे जाऊन बिग बाजारचे व्यवस्थापक आमित नंदवाला यांना भेटून जय भारतीय जनरल कामगार संघटना स्थापन झाल्याचे पत्र दिले. या प्रसंगी पनवेल महानगर पालिकेचे प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, भाजप युवा नेते मयुरेश नेटकर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, विचुंबे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर भारतीय जनरल कामगार  संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी, संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, समिरा चव्हाण, कार्यालयीन सचिव, रवींद्र कोरडे उपस्थित होते.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply