शेकापचे वाकडी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’
पनवेल : रामप्रहर वृत्त
सक्षम नेतृत्व व विकासात अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षात विविध पक्षांतून दाखल होणार्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, वाकडी ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 4) भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, जि. प. सदस्य अमित पाटील, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, एकनाथ भोपी, शिवाजी दुर्गे, महादेव गडगे, राजेश फडके, सरपंच नरेश पाटील, उपसरपंच विनोद भोपी, गणेश पाटील, अरुण पाटील, धनंजय पाटील, पांडुरंग केणी, कमलाकर केणी, रमेश पाटील, संतोष पाटील, गणेश खुटले आदी उपस्थित होेते.
या वेळी शेकापचे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव जमदाडे, नाना पाटील, विद्यमान सदस्य संदीप पाटील, पुरोगामी संघटना उपाध्यक्ष मंगेश पाटील, बाळू पवार, विश्वनाथ पाटील, योगेश पवार, रमेश पवार, अमित जमदाडे, अतिश जमदाडे, कुंदा पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत केले.
या कार्यक्रमात भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी एकनाथ भोपी आणि कोन पंचायत समिती युवा मोर्चा उपाध्यक्षपदी सुमित गोजे यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
करंबेळी येरमाळमध्येही परिवर्तन
पनवेल : शेकापचे कुचकामी धोरण व निष्क्रिय नेतृत्वाला कंटाळून करंबेळी येरमाळ येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 5) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
पनवेलमधील मार्केट यार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात करंबेळी येरमाळ येथील शेकापच्या शिरवली ग्रामपंचायतीच्या सदस्य संगीता भगत, माजी सदस्य भगवान पारधी, युवा कार्यकर्ते जनार्दन भगत, बबन भगत, बुधाजी निरगुडा, महादू पारधी, राजू भगत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी ‘कमळ’ हाती घेतले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे आदी उपस्थित होते.