Breaking News

गल्ल्यातील पैसे न दिल्याने कोयत्याने प्रहार करणार्यास अटक

उरण ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील नारायण काशिनाथ पाटील (55) यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या हेतूने कोयत्याने वार करणार्‍या आरोपीस न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार फिर्यादी नारायण काशिनाथ पाटील यांच्या न्हावा गावातील मालकीच्या साई बेकरीत काल दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास प्रवेश करून त्यांच्याकडे बेकरीच्या गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने मागितले असता, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी इसम सुशांत ठाकूर (30) जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, फिर्यादी यांनी बेकरीच्या गल्ल्यातील पैसे न दिल्याने आरोपी सुशांत ठाकूर याने धारदार लोखंडी कोयत्याने नारायण पाटील यांच्या अंगावर जोराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्हावाशेवा पोलिसांत आरोपी विरुद्ध भादंवि 307 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पाटील हे करीत असून, पोलीस कर्मचारी राजेंद्र पाटील, प्रमोद पाटील, प्रसाद वायंगणकर, रूपेश दराडे व गणेश सोंडे यांच्या पोलीस पथकाने आरोपीस तत्काळ जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply