Breaking News

मतमोजणीची तयारी पूर्ण

पेणमध्ये प्रशासन सज्ज; पोलीस यंत्रणाही दक्ष

पेण : प्रतिनिधी

पेण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. 24) सकाळी 8 वाजल्यापासूून कोएसोच्या पेणमधील लिटील एंजेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आले असून 150 प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले. मतमोजणीची सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीने करण्यात येणार असून एकूण 27 फेर्‍यांमध्ये 375 मतदान केंद्रांवरील मतमोजणी केली जाणार आहे. साधारणत: दुपारी 2 वाजेपर्यंत मतमोजणीचे काम पूर्ण होऊन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्रावर व परिसरात कडक सुरक्षा प्रबंधक तैनात केले असून, त्यामध्ये दोन डीवायएसपी, तीन पोलीस निरीक्षक, 17 सहाय्यक व उपनिरीक्षक, 20 वाहतूक पोलीस, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची चार पथके आणि 120 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

वाहतूक नियोजनाची अधिसूचना जारी

पेण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने पेण शहरातील वाहतुकीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकार्‍यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार अलिबागकडून पेण शहरात येणारी तीनचाकी, दुचाकी वाहने  हायवे ट्रॅफीक चौकीजवळील अंडरपासमधील दोन नंबर गेटमधून पेण शहरात प्रवेश करतील, तसेच पेण शहरातून अलिबागकडे जाणारी तीनचाकी व दुचाकी वाहने हायवे ट्रॅफीक चौकीजवळील अंडरपासच्या गेटमधून बाहेर जातील. हायवे ट्रॅफीक चौकीपासून हिमगौरी हॉटेलकडे जाणारा सर्व्हिस रोड अंतोरा फाट्यापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. मुंबईकडे जाणार्‍या वाहनांकरिता हायवे ट्रॅफीकसमोरील सबवे खुला करण्यात येऊन त्यांना मुख्य हायवेवर प्रवेश देण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीसमोरील अंतोरा अंडरपासकडे जाणारा सर्व्हिस रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. कोटक महिंद्रा बँकेसमोरील अंतोरा अंडरपास वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. एसटी बस, ट्रक, टेम्पो अशी जड वाहने खोपोली बायपासने पेण शहरात प्रवेश करतील व त्याच मार्गाने बाहेर जातील. मुंबई-गोवा हायवेवरील सीएनजी पंप बंद ठेवण्यात येईल.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply