Breaking News

…अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट; भाजपचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

सत्तावाटपाच्या अर्ध्या-अर्ध्या फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेला भाजपने अखेर निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे भाजपने म्हटले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता भाजपच्याच हाती राहणार असल्याने शिवसेना आता काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी नव्या सरकारच्या स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे, तर भाजपने मुख्यमंत्रिपदच काय पण महत्त्वाची खातीही देण्यास नकार दिल्याने घोडे अडले आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता पर्यायाने भाजपच्याच हातात राहणार आहे व नंतर भाजपला त्यांचा अजेंडा राबवता येणार आहे. जम्मू-काश्मीर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

मेहबूबा मुफ्ती यांच्याशी पटत नसल्याने भाजपने त्यांचे सरकार काढून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली आणि पुढे या राज्याचे विभाजन करून तेथील 370 कलम रद्द करून टाकले. हा अनुभव असल्याने शिवसेना आता नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply