Breaking News

रोहित शर्माने विराट, धोनीलाही टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा सलामीवीर आणि टी-20 क्रिकेट संघाचा बदली कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात अवघ्या नऊ धावा करून बाद झाला, मात्र या नऊ धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्याच्या बाबतीत धोनीला, तर सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराटला मागे टाकले.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये उतरताच रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याच्या बाबतीत आता रोहित धोनीच्याही पुढे आहे. रोहितच्या नावावर भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्याच्या विक्रम झाला आहे.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply