Breaking News

वाजे गावाजवळ वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार

पनवेल ः महिंद्रा गाडीवरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व अविचाराने चालवून समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील वाजे गावाच्या हद्दीत घडली. जेम्स दुराई पांडियान (रा. कोप्रोली) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची एमएच 46-बीए 2731 ही गाडी चालवित असताना समोरून आलेले हरिश्चंद्र सीताराम जळे यांच्या मोटरसायकलीस धडक दिली. या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात आणले असता, तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, उपनिरीक्षक कुदळे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply