Breaking News

मातृवंदन शिबिरात महिलांना आधारकार्डचा लाभ

कर्जत ः प्रतिनिधी

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान यांच्या माध्यमातून कडाव येथे मातृवंदन कार्यक्रमांतर्गत आधारकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 127 महिलांना आधारकार्ड काढून देण्यात आली. तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कडाव आणि आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन कडाव येथील ग्राम सचिवालय येथे करण्यात आले होते.

राष्ट्रीय स्वास्थ्य अभियानांतर्गत आयोजित शिबिराचे उद्घाटन कर्जतचे

तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांच्या हस्ते झाले. प्रधानमंत्री मातृवंदन योजना व प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन (आयुष्यमान भारत योजना) या शासकीय योजनांबद्दल उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दोन दिवसांच्या शिबिरात 127 महिला लाभार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या आधारकार्डची नोंदणी करून दुरुस्ती केली. सदर शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिरा माने, आरोग्य सहाय्यक व्ही. एन. कटारे, आरोग्यसेवक एन. डी. पाटील, डी. पी. घरत, बी. एन. जाधव, गटप्रवर्तक एस. एन. गंगावणे तसेच कार्यक्षेत्रातील सर्व आशा सेविकांनी यशस्वीपणे पार पाडले. आधारकार्ड नोंदणीसाठी कर्जत, कडाव आणि कशेळे येथील सेवा केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply