Breaking News

कोप्रोलीत एचडीएफसी बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधी सेंटरचे उद्घाटन

उरण ः रामप्रहर वृत्त

कॉमन सर्विस सेंटर (उडउ) कोप्रोली उरण येथे एचडीएफसी बँकेचे अधिकृत व्यवसाय प्रतिनिधी सेंटरचे उदघाटन गुरुवारी (दि. 12) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. या वेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, पनवेल-दापोलीचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक के. ए. म्हात्रे, जेएनपीटी विश्वस्त रविंद्र पाटील, जेएनपीटी सुप्रिटेंडन ऋषिकेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, हास्य सम्राट संजीवन म्हात्रे, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक विजय इलावे, उडउ महाराष्ट्रचे सहाय्यक उपाध्यक्ष (अतझ) समीर पाटील, उडउ रायगड जिल्हा व्यवस्थापक गोपाळ गायकवाड , निवृत्त पोलीस सहाय्यक निरीक्षक पी. के. म्हात्रे, निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रकांत म्हात्रे, उरणचे मंडळ कृषी अधिकारी एन.वाय. घरत, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, एचडीएफसीचे व्हाईस प्रसिडेंट नरेश येळकोटकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्मिता संदीप म्हात्रे, संदीप पोसुराम म्हात्रे यांनी केले होते.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply