Breaking News

गृहीतकांच्या चाचणीवर व्याख्यान

खारघच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमधील उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी (दि. 15) रोजी गृहीतकांच्या चाचणीवर टेस्टींग ऑफ हायपोथेसिस या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी खांदा कॉलनीच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गणित विभागाच्या प्रा. मयुरी जोशी या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. या व्याख्यानामध्ये प्रा. मयुरी जोशी यांनी विद्याथ्यांना संशोधन कार्यासाठी ग्रहीताकांची चाचणी टेस्टींग ऑफ हायपोथेसिस कशी करावी? तर संशोधन कार्यासाठी लागणाया विविध चाचणी गृहीताकांचे प्रकार स्पष्ट केले.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या क्षेत्रात ज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन कार्याचे महत्त्व पटवून दिले. व्याख्यांनाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता जांगिड यांनी केले. कार्यक्रमाची सविस्तर माहिती प्रा. रेवान शिंदे यांनी दिली तसेच प्रा. रित थुळे यांनी अतिथींची माहिती दिली. प्रा. पदमप्रिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रा. प्रवीण सावे आणि प्रा. मीरा पटेल यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिध्देश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply