Monday , June 5 2023
Breaking News

‘शिवसेनेचे 35 आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज’

ठाणे : भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेचे 56 पैकी 35 आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अकार्यक्षम असल्याने भाजप पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त राणे ठाण्यात आले होते. त्या वेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते, ते पोकळ ठरले आहे. त्याचबरोबर या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार हेही माहिती नाही. सरकार कसे चालवायचे हेच त्यांना कळत नाही. त्यामुळे अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या? सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी पाच आठवडे घेतले. त्यामुळे ते सरकार कसे चालवणार हे दिसून येते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply