Breaking News

महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणार -डॉ. कविता चौतमोल

पनवेलच्या महापौर, उपमहापौरांनी स्वीकारला पदभार

पनवेल : प्रतिनिधी
महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्याचा आणि त्यांनी उत्पादन केलेल्या मालाला विक्रीसाठी महापालिका हद्दीत केंद्र उभारण्याला प्राधान्य देणार असल्याचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिकेच्या सलग दुसर्‍या टर्ममध्ये महापौर म्हणून पदभार स्वीकारल्यावर त्या बोलत होत्या.
पनवेलच्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता चौतमोल आणि उपमहापौरपदी रिपाइंचे जगदीश गायकवाड निवडून आल्यानंतर या दोघांनी मंगळवारी (दि. 14) महापालिकेतील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारला. या औपचारिक कार्यक्रमास सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, मुकीद काझी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, रूचिता लोंढे, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरिश मोकल, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भारतीय जनता पक्षाने आपल्याला पुन्हा संधी दिल्याबद्दल पक्षाच्या नेतृत्वाला, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना धन्यवाद दिले. महापालिकेमार्फत महिलांचे सक्षमीकरण आणि आरोग्याच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply