पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी सन्मान ’ती’चा या शीर्षकांतर्गत विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी बापूसाहेब डी. डी. विसपुते अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून शकुंतला रामशेठ ठाकूर, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, नगरसेविका सुशिला घरत, वैशाली देशमुख, शाळा समिती सदस्य जयवंत मुंबईकर उपस्थित होते.
या वेळी विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमास श्री. रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य कैलास म्हात्रे, सीकेटी शैक्षणिक संकुलातील विभागप्रमुख व मराठी माध्यम मुख्याध्यापिका इंदूमती घरत, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटियन, पर्यवेक्षिका अनुराधा कोल्हे, प्रशांत मोरे, अजित सोनवणे, संध्या अय्यर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper