Breaking News

पाणजेत विद्युत प्रकाशझोतातील रजनी क्रिकेट स्पर्धा

उरण : वार्ताहर

तालुक्यातील पाणजे येथे अक्कादेवी क्रिकेट क्लबच्या वतीने विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

भाजप युवा नेते हरेश भोईर आणि सरपंच करिश्मा भोईर यांनी ही चारदिवसीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे

उद्घाटन तालुका अध्यक्ष रवि भोईर व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 4) झाले. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप उरण शहराध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, नगरसेवक राजेश ठाकूर, पं. स, सदस्य दीपक ठाकूर दीपक भोईर, जितेंद्र पाटील, शेखर तांडेल, नीळकंठ घरत, शशी पाटील, सुनील पाटील, देवेंद्र पाटील, मोहन भोईर, विठ्ठल भोईर, कमलाकर भोईर, विजय पाटील, बबन पाटील, उपसरपंच विलास भोईर, सदस्य आशा भोईर, नम्रता पाटील आदी उपस्थित होते. 

स्पर्धेला आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. सोबत पाणजे गावचे माजी सरपंच मच्छिंद्र पाटील होते. आयोजकांच्या वतीने आमदारांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान, स्पर्धेसाठी विश्वनाथ पाटील, सुरेश भोईर, प्रभाकर पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील सहकार्य करीत आहेत.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply