Breaking News

भटक्या व विमुक्त जाती संघाच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भटक्या व विमुक्त जाती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्रके वाटप करण्यात आली.

यामध्ये युवक प्रदेश अध्यक्ष आकाश भोसले, महिला आघाडीच्या शारदा इंगोले, पनवेल शहर अध्यक्षपदी प्रताप इंगवले, पनवेल शहर उपाध्यक्षपदी विक्रम भोसले यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्याभेटीदरम्यान त्यांनी माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply