बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह 12 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील सांसद आदर्श बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम जोमाने वाजू लागले असून, 24 मार्च रोजी होऊ घातलेल्या या बांधपाडा ग्रामपंचायत निवडणुकीची छाननी प्रक्रिया उरण तहसील येथे पार पाडण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी थेट सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने या पदासाठी एकूण पाच उमेदवारांचे अर्ज निश्चित करण्यात आले आहेत, तर चार प्रभागांतील 11 सदस्यांच्या जागांसाठी एकूण 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. एकंदरीत या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचांसह 12 जागांसाठी 27 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. यामध्ये थेट सरपंचपदासाठी शिवसेनेच्या योगिता पाटील व भाजपाच्या विशाखा ठाकूर, शेकाप-काँग्रेस आघाडीच्या  स्वप्नाली ठाकूर, तर जयेशा ठाकूर व वनश्री पाटील हे दोन अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. प्रभाग क्र. 1मध्ये सदस्यांच्या तीन जागांसाठी जितेंद्र पाटील, देवानंद पाटील, अपेक्षा पाटील, निकिता पाटील, भावना पाटील, दीपिका पाटील व राजश्री पाटील या सात उमेदवारांनी रणशिंग फुंकले असून प्रभाग 2 मधील दोन जागांसाठी शुभांगी ठाकूर, सुरेखा ठाकूर, दीपिका म्हात्रे, रितेश ठाकूर, अलंकार पाटील व राजेंद्र म्हात्रे हे सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत.  प्रभाग क्र. 3मधील तीन जागांसाठी प्रणिता ठाकूर, मेघा ठाकूर, रंजिता ठाकूर, करिष्मा म्हात्रे, मीनाक्षी म्हात्रे, अच्युत ठाकूर व निनाद म्हात्रे असे सात उमेदवार रिंगणात असून, प्रभाग क्र. 4मधील तीन जागांसाठी अनंत ठाकूर, संदेश म्हात्रे, देविदास ठाकूर, सुजित म्हात्रे यांच्यासह जागृती घरत व उषा म्हात्रे हे सहा उमेदवार आमनेसामने निवडणुकीच्या आखाड्यात उभे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. के. म्हात्रे यांनी दिली. बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप-काँग्रेस आघाडी करण्यात आली असून, मागील सत्तेत काँग्रेससोबत असलेल्या शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. नव्याने असलेल्या भाजपाने प्रथमच या ठिकाणी सरपंचासह सात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर थेट सरपंचपदासाठी दोन अपक्षांनी व सदस्यांसाठीही दोन अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply