Breaking News

महाराष्ट्र संघाने जिंकला टी-20 दिव्यांग चषक

औरंगाबाद : प्रतिनिधी

महाराष्ट्र संघाने अखिल भारतीय टी-20 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. दीपक जावळेने कर्णधाराला साजेल अशी केलेली फलंदाजी आणि अभिलाष लोखंडे याचा अष्टपैलू खेळ या बळावर महाराष्ट्राने गरवारे क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात राजस्थानवर पाच गडी राखून मात करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना राजस्थानला 20 षटकांत 6 बाद 126 धावांवर रोखले. त्यांच्याकडून नदीमने अर्धशतक  केले. महाराष्ट्राकडून अभिलाष लोखंडे आणि धम्म जाधव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले; तर विकी रणदिवे व सय्यद एम. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने विजयी लक्ष्य 16.1 षटकांत 5 गडी गमावून सहज गाठले. औरंगाबादच्या दीपक जावळे याने कर्णधाराला साजेशी खेळी करताना 26 चेंडूंत 4 चौकार व एका षटकारासह नाबाद 37 धावा करीत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला ज्योतीराम घुलेने 25 चेंडूंत 3 चौकारांसह 27 आणि गोलंदाजीत चमक दाखविणार्‍या अभिलाष लोखंडे याने 25 चेंडूंत 5 चौकारांसह 29 धावांची निर्णायक खेळी केली. राजस्थानकडून महावीरसिंग, सुरेश, कुलदीप, नरेंद्र यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Check Also

न्हावे येथील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पार्थ इंटरप्रायझेसच्या वतीने सरपंच चषक 2024 क्रिकेट स्पर्धा न्हावे येथे आयोजित …

Leave a Reply