Breaking News

प्रशासनाकडून भिंगारवाडी हे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित

पनवेल : वार्ताहर, बातमीदार

जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो. आजिवली येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply