Breaking News

उरण-मोरा परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील मोरा येथे एक व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहात असलेला दक्षिणेकडून भवरा गणपती मंदिराजवळील सदाशिव केशव पारकर ते उत्तरेकडील उरण-मोरा आयएसीएल कंपनी जवळील सुनिल कृष्णा कोळी यांचे घर ते पश्चिमेकडील डोंगरभाग ते पूर्वेकडील समुद्र किनारा हा परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  

या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply