Breaking News

मोटरसायकलस्वारांवर गुन्हा दाखल

पेण ः मोटरसायकलवरून डबल सीट जाणार्‍या दोन जणांवर पेण पोलिसांनी बंदी आदेश कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. दोन जणांना आपल्या ताब्यातील मोटरसायकलवरून सकाळी डबल सीट रामवाडी बसस्थानक ते पेण शहरात जाताना पोलिसांनी पकडले. तपासणीत त्यांच्याकडे गाडीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय आदेशाचा भंग तसेच कोरोना संक्रमण पसरविण्याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार तडवी करीत आहेत.

‘शिवशाही’तील एलइडीची चोरी

पेण ः पेणमधील रामवाडी येथील बसस्थानकातील शिवशाही बसचा एलइडी अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. फिर्यादीच्या ताब्यातील शिवशाही बसमधील आठ हजार 400 रुपये किमतीच्या एलइडीची 27 एप्रिल ते 5 मेदरम्यान चोरी झाली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार दोरे करीत आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply