नगर परिषदेकडून धोकादायक फांद्यांची छाटणी
उरण : वार्ताहर – कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे मान्सून पूर्व कामाला सुरुवात केली आहे. उरण नगरपरिषद हददीतील, शहरातील धोकादायक झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटनीचे काम नुकतेच सुरु करण्यात आले आहे.
पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वारा या पासून झाडे कोलमडून विजेच्या तारांवर, घरांवर पडून कोणतीही वित्त व जीवित हानी होऊ नये, नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये. नागरिकांचे संरक्षण व्हावे, या करिता दरवर्षी उरण नगरपरिषद कडून मान्सून पूर्व शहरातील धोकादायक झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटनीचे कामे केली जातात.
दरवर्षाप्रमाणे यांना हि कामे सुरु करण्यात आली आहेत. मान्सून पूर्व गटारांची साफसफाई, शहरातील झाडांच्या वाढलेल्या धोकादायक फांद्या छाटणी करणे व इतर कामे केली जातात. उरण नगरपरिषद कडून केली जातात.
उरण नगरपरिषदचे विमला तलाव, उद्यान, पेन्शनर पार्क, बोरी रस्ता, उरण ते मोरा रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडांच्या वाढलेल्या धोकेदायक फांद्या, भवरा येथील उद्यान, तसेच भवरा ते मोरा येथील उद्याने व रस्ताच्या दोन्ही बाजूस झाडांच्या वाढलेल्या धोकादायक फांद्या छाटनीचे काम आलेअसून अजुनही पुढील काम होणार आहे.
या कामी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, उद्यान निरीक्षक महेश लवटे, सफाई कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे.
पावसाळ्यात मुसळधार पाऊस, वारा यापासून झाडे कोलमडून विजेच्या तारांवर, घरांवर पडून कोणतीही वित्त व जीवित हानी होऊ नये, नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये. नागरिकांचे संरक्षण व्हावे, या करिता दरवर्षी उरण नगरपरिषद कडून मान्सून पूर्व कामे केली जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कामे सुरु करण्यात आली आहेत. नागरिकांनी कर्मचार्यांना सहकार्य करावे.
-महेश लवटे, उद्यान निरीक्षक, उरण नगरपरिषद