Breaking News

वासांबे हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनीतही कोरोनाने शिरकाव करुन परीसरात भिती निर्माण केली आहे. याअगोदर रसायनी विभाग वगलता फक्त वासांबे (मोहोपाडा) हद्दीतील बारा कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर या आठवड्यात नव्याने बारा कोरोनारुग्ण आढळलेही आहेत.शिवाय रसायनी पाताळगंगा औद्योगिक परीसरात काही कंपनीत बर्‍याच बाहेरील कामगारांची संख्या असून काहींना लागण झाल्याने क्वारंटाइन केल्याची कामगारवर्गात चर्चा आहे.

दरम्यान, रसायनी परीसरातील फक्त वासांबे (मोहोपाडा) हद्दीत मागील आठवड्यापासून पुन्हा कोरोनाने शिरकाव केला असून रविवार दुपारपर्यंत एकूण बारा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. या आठवड्यात कोरोनाचा फैलावर वाढला असून मोहोपाडा येथील एका नामांकित डॉक्टरलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर चांभार्ली नवीन वसाहतीमधील गणेशनगर येथे कोरोना रुग्ण संख्या वाढत असून रविवारी नव्याने एक महिला पॉजिटिव्ह आली आहे. तर 66 वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. तर रिस येथील 31 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे.

रविवारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीत बारा कोरोना रुग्णसंख्या झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. याअगोदर गणेशनगर मधील दोघा पती-पत्नीचा कोरोना अहवालही पॉजिटीव्ह आला होता. वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply