Breaking News

कोरोना पॉझिटिव्ह अधिकार्‍याची अविरत रुग्णसेवा

पनवेल ः बातमीदार

शहर महापालिका वीज विभागातील अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्यानंतरही या अधिकार्‍याने विलगीकरण कक्षासाठी आवश्यक असलेल्या गरम पाण्यासाठी 36 यंत्रे बसवून देण्याच्या कामाला प्राधान्य दिले. लक्षणे दिसत नसल्याने सुटीवर न जाता घरातून काम केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पालिकेला साथ देण्याचा निर्धार व्यक्त केल्याने या कोरोना योद्ध्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मागील 100 दिवस पनवेल पालिकेचे अनेक कर्मचारी-अधिकारी आठवडा सुटी न घेता कोरोना संकटात पनवेलकरांची सेवा करीत आहेत. यात स्वच्छतादूत, आरोग्य सेवक, डॉक्टर आणि अभियंता यांची मोठी फळी काम करीत आहे. पालिकेत सध्या 2000 कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे 300 कर्मचारी आणि अधिकार्‍यांवरील ताण वाढला आहे. कोरोनाच्या संकटकाळात हा ताण पूर्वीपेक्षा दुपटीने वाढला आहे. पालिकेच्या वीज विभागातील एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली, मात्र तरीही या अधिकार्‍याने मागे न हटता रुग्णांसाठीच्या सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले.

तपासणीनंतर कोरोना झाल्याचे आढळल्यानंतरही अगोदर पालिकेने उभारलेल्या इंडिया बुल्स येथील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांसाठी आवश्यक गरम पाण्यासाठी 36 यंत्रे लावण्याचे काम या अधिकार्‍याने पूर्ण केले. लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही घरातूनच उपचार घेण्यास प्राधान्य दिले. याशिवाय घरातून पालिकेच्या वीज विभागाचे काम करण्याससुरुवात केली.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply